वेद पूजन संपन्न

वेद म्हणजे जगातील सगळ्यात प्राचीन ग्रंथ. वाटपौर्णिमेच्या दिवशी वेदांची उत्पत्ती झाली आशी मान्यता आहे म्हणून या दिवशी वेद पूजन करण्यात येते. वेद पूजनामध्ये चारही वेद ठेवण्यात येतात व मंत्रोचारात त्यांचे पूजन करण्यात येते. या निमित्याने अमरावती शहरातील सर्व पौरोहित्य करणारे ज्ञाती बांधवांची संस्था श्री वेदसेवा प्रतिष्ठान व ब्राह्मण सभा, अमरावती यांच्या संयुक्तिक विद्यमाने  वेदपूजनाचा कार्यक्रम दरवर्षी वट सावित्री च्या दिवशी करण्यात येतो. या वर्षी 14 जून रोजी झालेल्या वेद पूजनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ श्रीमती मंदाताई गंधे व ह.भ.प. श्री श्यामजी देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.