
ब्राम्हण्य: सर्व धर्मज्ञ:शांतो दांतो गतक्लम:
प्रिय ज्ञाती बांधवांना सप्रेम नमस्कार,, ब्राह्मण सभा अमरावती च्या वेबसाईटवर आपले स्वागत असो. ब्राह्मण सभा ही एक धर्मदाय कायद्याच्या अंतर्गत पंजीकृत संस्था आहे ब्राह्मण समाज बांधवाच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्पादनाकरिता कार्यरत असणाऱ्या ब्राह्मण सर्वे द्वारा त्याच्या निर्धारित उद्देशाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम व योजना राबवल्या जातात या सर्वांची ओळख समाज बांधवांना व्हावी त्याबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने सदर वेबसाईट ब्राह्मण सभा अमरावती द्वारा सुरू करण्यात आलेली आहे. ब्राह्मणसभेचे समाज बांधवांसोबत संबंध व संवाद वृद्धिंगत होण्याकरिता ही वेबसाईट कार्य करेल असा आमचा मानस आहे. वेबसाईटच्या विविध विभागांना आपण भेटी द्याव्या व इतरही समाज बांधवांना या वेबसाईट बद्दल सांगावे ही अपेक्षा व विनंती.
संस्था व संस्थेची घटना 16 नोव्हेंबर 1967 रोजी मुंबई ट्रस्ट Act खाली नोंदवली गेली असून रजिस्टर क्रमांक A/ 1413/अमरावती असा आहे.
आमसभेची सूचना
सर्व सभासदांना कळविण्यात येते की संस्थेची आमसभा दिनांक ०५/०१/२०२५ रोजी दुपारी ४.०० वा ब्राह्मण सभा कार्यालय, श्रीमती जयश्री कुलकर्णी सभागृह या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी आपण या सभेस उपस्थित रहावे ही विनंती.
सुनील पाठक, सचिव, ब्राह्मण सभा.
सभेची विषय सूची.
१. दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली.
२. मागील आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
३. आर्थिक वर्ष २०२३-२४ जमा-खर्च पत्रक सादर करणे व त्याच्या लेखा परीक्षणास मान्यता देणे.
४. कार्यकारी मंडळांनी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकारी यांचे मार्फत सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षाकरिता संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड करणे.
५. मा. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय.
टीप – गणपूर्ती अभावी स्थगित झालेली सभा त्याच ठिकाणी अर्धा तासाने घेण्यात येईल व या सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
निवडणूक अधिकारी यांच्या सहमतीने पुढील निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येत आहे
निवडणूक कार्यक्रम
१. सभासद मतदारांची गटनिहाय यादी प्रसिद्ध करणे २५/१२/२४
२. सभासद मतदार यादीवर लेखी आक्षेप स्वीकारणे. २७/१२/२४
३. अंतिम सभासद मतदार यादी प्रसिद्ध करणे. २७/१२/२४
४. निवडणूक उमेदवारी अर्ज विक्री दिनांक २८/१२/२४ ते दिनांक ३०/१२/२४ अर्ज शुल्क १०० रुपये
५. रीतसर भरलेला अर्ज स्वीकारणे दिनांक २८/१२/२४ ते दिनांक ३१/१२/२४
६. अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख ०२/०१/२०२५
७. पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ०४/०१/२०२५ ( संस्था कार्यालयात व संस्थेच्या वेबसाईटवर)
८. कार्यकारिणीची निवड करणे, या करीता आवश्यकता असल्यास आमसभेमध्ये मतदान ०५/०१/२०२५ दुपारी ५:०० ते ६:०० या वेळात घेण्यात येईल.
९. निवडणूक निकाल व कार्यकारणी यादी निवडणूक अधिकाऱ्याद्वारे प्रसिद्ध करणे दि. ०५/०१/२५ सायं ७ वा
नियम व अटी
१. पूर्ण भरलेला उमेदवारी अर्ज आपले आधार कार्ड ची झेरॉक्स सह उमेदवाराने स्वतः सादर करायचा आहे.
२. निवडणुक उमेदवारीची पात्रता घटनेमध्ये नमूद नियमानुसार असेल.
३. दिनांक २८/१२/२४ पासून सभासदांची प्रिंटेड यादी रुपये १००/- भरून संस्थेचे कार्यालयातून प्राप्त करता येईल.
४. कार्यालयीन वेळ स ९.०० ते १२.०० – सायं ५:०० ते ८:०० आहे याची नोंद घ्यावी. या वेळातच कार्यालयात संपर्क करावा. ( या कार्यक्रमा दरम्यान कार्यालय सर्व दिवस खुले असेल )
श्री. दीपक अलोणे – निवडणूक अधिकारी
विविध गटनिहाय सभासद याद्या पाहण्यासाठी कृपया डाऊनलोड विभागात जा ( लिंक वर आहे )
संस्थेची घटना येथे डाऊनलोड करू शकता (pdf) सभेची सूचना pdf फाईल मध्ये
सूचना – दिवंगत झालेल्या सदस्याबद्दल त्यांच्या कुटुंब सदस्यांच्या निदर्शनास आल्यास संस्थेला कळवावे. त्यांची नावे कार्यकारिणीमध्ये मंजूर करून काढून टाकण्यात येतील.
उपवर वधू ” ऋणानुबंध”

सदस्यता शुल्क रु 700.
उपवर वधू ” ऋणानुबंध” app गुगल प्ले स्टोअर ला उपलोड केले आहे , यापुढे केवळ APP उपलब्ध असेल.
APP ची लिंक खालील प्लेस्टोअर च्या icon ला दिली आहे
अथवा पुढील लिंक ला क्लिक करा व app डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.rushivarya.bsabha
APP बद्दल काही अडचण असल्यास फोन करा -सुनील पाठक सचिव ९४२१८२२३४१
देणगी देण्यासाठी कृपया संपर्क साधा.
विद्यार्थी सहाय्यता निधि तसेच आरोग्य वर्धीनी योजनेसाठी देणगी स्वीकारत आहोत.

ऑनलाइन देणगी
आजीवन सभासद शुल्क रु. ५००० व वार्षिक सभासद शुल्क रु १५० ( प्रथम असल्यास १८० रु). संस्थेचे सदस्य/सभासद होण्यासाठी पुढील
सदस्यता घेण्यासाठी या लिंकवर ऑनलाइन गुगल अर्ज उपलब्ध अथवा संस्थेकडे छापील अर्ज उपलब्ध आहेत ते भरून खलील बँक खात्यात सदस्यता शुल्क ट्रान्सफर करू शकता,
बाजूला असलेल्या QR कोड ला स्कॅन करून आपण ब्राह्मण सभा अमरावती ला वर्गणी/ देणगी पाठवू शकता. मात्र पाठवलेल्या रक्कमेची पुढील माहिती आम्हाला पाठवणे आवश्यक आहे.
- देणगीदाराचे नाव, पत्ता , मोबाइल क्रमांक
- देणगी कश्यासाठी दिली आहे
- PAN कार्ड च नंबर
- देणगी चा दिनांक
- देणगीचा transaction क्रमांक
ही माहिती कळवण्यासाठी WhatsApp 9421822341 अथवा bsabha27@adminकॉल करावा
अन्यथा पुढील पैकी संपर्क साधावा – श्री सुधीर जोशी – कोषाध्यक्ष ९८२२३१६४१०, सौ. मनीषाताई विनोद मराठे सहसचिव – ९४०३८६६३७३, सुनील पाठक सचिव ९४२१८२२३४१, प्रसाद खरे सहसचिव ९५११७१८२३२
ऑनलाइन देणगी साठी असणार्या अटी व नियम या पेज च्या खाली दिलेले आहेत ते कृपया वाचून व्यवहार करावा
विविध कार्यक्रम






READ TERMS AND CONDITIONS FOR ONLINE PAYMENT, CANCELLATION & REFUND POLICY | PRIVACY POLICY