ब्राम्हण्य: सर्व धर्मज्ञ:शांतो दांतो गतक्लम:
प्रिय ज्ञाती बांधवांना सप्रेम नमस्कार,
ब्राह्मण सभा अमरावती ही एक पंजीकृत संस्था आहे. या संस्थेचा उद्देश समाजासाठी विविध सामाजिक शैक्षणिक वा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे असा आहे. गेल्या पन्नास पेक्षा अधिक काळापासून ब्राह्मण सभा विविध सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे. सुमारे 78 वर्षांपूर्वी कै. कृष्णाजी गणेश सहस्त्रबुद्धे. कै. वासुदेव गणेश उर्फ काका तांबे, कै. दत्तोपंत नाटेकर इत्यादी मंडळींच्या प्रयत्नाने अमरावतीत ब्राह्मण सभेची स्थापन झाली. संस्थापक सदस्यांनंतर समजतील अनेक लोकांनी व कार्यकर्त्यांनी आपला वेळ-ऊर्जा देऊन संस्थेला आज मोठे केले आहे .
संस्था व संस्थेची घटना 16 नोव्हेंबर 1967 रोजी मुंबई ट्रस्ट Act खाली नोंदवली गेली असून रजिस्टर क्रमांक A/ 1413/अमरावती असा आहे.
ब्राह्मण सभा ही संस्था गेले अनेक वर्षे कार्यरत असून 1967 साली रीतसर रजिस्ट्रेशन करून अस्तित्वात आली आहे. ब्राह्मण सभा चे दरोगा प्लॉट राजापेठ, अमरावती येथे एक भव्य वास्तू आहे या वास्तूचा उपयोग समाजातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जातो. आजवर योगदान देणार्या सर्व लोकांचे आम्ही ऋणी आहोत त्यांच्या योगदानाशिवाय आज उभी असणारी ब्राह्मण सभा शक्य नव्हती.
सामूहिक व्रतबंध
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
समाजातील विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार
पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम जसे मकर संक्रमण चैत्रगौर इत्यादीचे आयोजन करणे
समाजासाठी उपयुक्त योजना राबवणे
होतकरू गरीब विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक मदत पुरवणे
दुर्धर आजाराने ग्रस्त समाजातील गरीब रुग्णांना मदत करणे