
ब्राह्मणसभा अमरावतीच्या वतीने दरवर्षी सामूहिक व्रतबंध सोहळा घेण्यात येतो. महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलांचा हा संस्कार योग्य वयात व अल्पखर्चात व्हावा या हेतूने या कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मणसभा करते. मागील कालावधी मध्ये कोरोना निर्बंधामुळे सामूहिक व्रतबंध होऊ शकले नव्हते, यावर्षी सामूहिक व्रतबंध सोहळा २२ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.
ब्राह्मण सभा अमरावती तर्फे सर्व ज्ञाती बांधवांना आवाहन करण्यात येते की या संधीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या परिचित ज्ञाती बांधवास या बद्दल माहिती सांगावी. एखादे कुटुंब आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरू शकत नसल्यास त्यांनी ब्राह्मणसभा, दरोगा प्लॉट अमरावती कार्यालयात संपर्क साधावा.
या सामूहिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे व आपल्या बटूची नोंदणी १ मे २०२३ पूर्वी करावी. नोंदणी फॉर्म व सामूहिक व्रतबंध कार्यक्रमाची माहिती ब्राह्मणसभा अमरावती च्या वेबसाईट www.bsabhamat.com वर प्रकाशित करण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरणे शक्य नसेल त्यांनी सभेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळात येऊन फॉर्म भरावा.
नियमावली
१. सामूहिक व्रतबंधाकरिता किमान ५ व्रतबंधाची नोंदणी आवश्य असेल. प्रत्येक मौंजी साठी शुल्क रु. ४१००/- आहे.
२. व्रतबंध ब्राह्मण सभा सांस्कृतिक भवन राजापेठ, कै.जयश्री प्रभाकरराव कुलकर्णी सभागृह येथे होईल.
३. बटू, माता-पिता व इतर सात असे एकूण १० जणांची भोजनाची सोय यात असेल.
४. १० पेक्षा जास्त व्यक्ति होत असल्यास प्रती व्यक्ति 200 रु. आकरण्यात येईल. जास्तीत जास्त 25 ची सोय होऊ शकेल. आपल्याकडून किती पाहुणे जेवणार आहेत ते १ मे २०२३ ता पर्यन्त तशी नोंद व शुल्क भरून नक्की करणे.
४. मातृभोजना करिता अष्टवर्गाची सामूहिक व्यवस्था ब्राह्मण सभेद्वारे करण्यात येईल.
५. ब्राह्मण सभेद्वारा बटूंचा सामूहिक फोटो काढण्यात येईल. आपल्याला विधींचे/वैयक्तिक फोटो हवे असल्यास त्याच फोटोग्राफरशी संपर्क साधावा.
६. चौल करणे अवश्य असेल.
मौंजि करता खालील वस्तू पालकांनी आणाव्या
१. आचमन पळी २, ताम्हण २, पेले २, लोटी, अहेर, उपरणे, दोन पंचे, अंतरपाट उपरणे, मोत्याच्या मुंडावळ्या, निरंजन, तबक, टॉवेल, नॅपकिन, बटुचे नवीन कपडे, टोपी, भिक्षावळी साहित्य, ( हळद, कुंकू, फुले, तुळस , बेलपत्र, अक्षता) वाती, फुलवाती, पंचामृत ( दूध/दही/साखर/तूप/मध) , होमाकरिता १/२ पाव देशी तूप, कणकेचे चार दिवे.
२. पालकांनी घरूनच आंघोळ करून यावी , केवळ बटुच्या अंघोळीची सोय कार्यस्थळी उपलब्ध.
३. बटू साथी सिल्कची अथवा कोरी चड्डी आणावी. वडिलांनी सोवळे आणावे.
४. भोजनाची वेळ 12 ते 2 असेल, वेळेवर उपस्थित राहून सहकारी करावे.
सूचना – १. किमती वस्तु आणू नये २ सोबत कुलूप आणावे. ३. कोरोना संबंधी त्यावेळी प्रशासनाने लागू केलेले नियम सर्वांना बंधनकारक असतील. काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल/रद्द करण्याचा अधिकार ब्राह्मणसभे कडे राहील.
ब्राह्मण सभा काय सोय करेल
पूरोहित, कार्यस्थळ, साफसफाई, पूजेसाठी फूल, बटुचे हार , मनगट्या , भोजनाची व्यवस्था.
भोजनमेनू – मसाले भात , ताक, दोन भाज्या, पापड, पोळी, जिलेबी, चटणी/सॅलड ( बदल करण्याचा अधिकार राखून)
खालील लिंक चा वापर करून नोंदणी फॉर्म उघडावा व भरावा (