आरोग्य वर्धिनी योजना

या योजनेच्या अंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील कोणी व्यक्ति दुर्धर आजाराने ग्रस्त असेल , मोठे ऑपरेशन असेल तर मदत केली जाते. याकरिता ब्राहण सभा कार्यालयाशी संपर्क साधावा

सहाय्य देण्यासाठी पुढील नियम आहेत

1. ज्या रुग्णाला मदत हवी असेल त्याने अथवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी ब्राह्मण सभेच्या कार्यालयात लेखी अथवा वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करावा.

2. ब्राह्मण सभेच्या सदस्याची शिफारस अथवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीची शिफारस असावी.

3. ब्राह्मण सभेची आरोग्य वर्धिनी समिति अर्जाचा विचार करून , डॉक्टर च्या सल्ल्याने व उपलब्ध निधीचा विचार करून मदत देईल.

2.  अर्जासोबत रुग्णाच्या मेडिकल कंडिशन/आजारचे/ऑपरेशन चे व हॉस्पिटल भरती असल्याचे रजिस्ट्रेशन कार्ड इत्यादि व रुग्णाचे आधार कार्ड जोडावे.

3.  प्राप्त झालेला अर्ज ब्राम्हणसभेच्या आरोग्यवर्धिनी समितीमध्ये ठेवला जाईल त्यामध्ये असणार्‍या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाला मदत करता येईल.

4.  रुग्णाला मदत करण्यासाठी निधी उपलब्ध असेल तरच मदत करणे शक्य होईल.