विद्यार्थी सहाय्यता निधी
समिति – श्री मोहन काटे, डॉ सौ दीपलक्ष्मी कुलकर्णी, श्री सुधीरभाऊ जोशी, श्री राजेश सोमलवार.
या योजनेअंतर्गत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले जाते. विद्यार्थी सहायता निधी अंतर्गत जमा राशीवर जे व्याज प्राप्त होते त्यातून व त्यानुसार निधी सहाय्यता निधी ठरवण्यात येतो.
विद्यार्थी सहाय्यता निधी नियम.
१. विद्यार्थ्याने वेबसाईट च्या माध्यमातून किंवा लेखी रीतसर अर्ज करावा. विद्यार्थ्यांच्या अर्जाला ब्राह्मण सभेच्या सदस्याचे शिफारस पत्र असावे. शिफारस पत्र नसल्यास समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून प्रमाणित करून घ्यावे याबाबत समितीचा निर्णय अंतिम राहील.
२. अर्जासोबत मागील उत्तीर्ण परीक्षेचे सर्टिफिकेट लावावे व तसेच चालू शिक्षणाचे सर्टिफिकेट लावावे.
3. योजनेचा उद्देश आर्थिक परिस्थिती मुळे कोणाचे मूलभूत शिक्षण थांबू नये हा असल्यामुळे माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच नॉन प्रोफेशनल कोर्सेस ( पदवी/पदव्युत्तर)करीता सहाय्य दिले जाऊ शकते.
4. प्रोफेशनल कोर्सेस जसे इंजिनिअरिंग, मेडिकल, एमबीए, बीबीए, एमसीए इत्यादी करिता सहाय्य करता येणार नाही. भविष्यात निधीमध्ये वाढ झाल्यास समिती यामध्ये बदल करून निर्णय घेऊ शकते.
5. उपलब्ध निधी शिल्लक असल्यास व मूलभूत शिक्षणातून कोणाचे अर्ज नसल्यास अशा वेळीच केवळ प्रोफेशनल कोर्सेसचा विचार केला जाऊ शकतो परंतु त्यासाठी समितीचा निर्णय अंतिम राहील.
6. कोणाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर निधी शिल्लक चा आढावा घेऊन कागदपत्रे तपासून व परिस्थितीचा विचार करून समितीने निर्णय घ्यायचा आहे.
7. विद्यार्थ्याकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात ते दहा दिवसांमध्ये त्याला उत्तर देणे गरजेचे राहील.
8. सहायता रक्कम केवळ चेक द्वारे देण्यात येईल.
9. सहाय्यता राशीला समिति निश्चित करेल त्या प्रमाणे मर्यादा असेल.