विद्यार्थी सहाय्यता निधी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना आर्थिक सहाय्य करते. निधीच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजातून सहाय्याची रक्कम ठरवली जाते.
कोण अर्ज करू शकतो:
- माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच नॉन-प्रोफेशनल पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी.
योजनेत समाविष्ट नाही:
- इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, BBA, MCA यांसारखे प्रोफेशनल अभ्यासक्रम. निधी शिल्लक असल्यास व समितीने निर्णय घेतल्यास अपवादाचा विचार होऊ शकतो.
अर्ज कसा करावा:
- वेबसाईटद्वारे किंवा सभेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज करावा.
- ब्राह्मण सभेच्या सदस्याचे किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारसपत्र जोडावे.
- मागील उत्तीर्ण परीक्षेचे आणि चालू शिक्षणाचे प्रमाणपत्र जोडावे.
- समिती कागदपत्रे व आर्थिक परिस्थिती तपासून ७–१० दिवसांत निर्णय घेईल.
- सहाय्याची रक्कम केवळ चेकद्वारे आणि समितीने ठरवलेल्या मर्यादेत दिली जाईल.
समिती:
- श्री. मोहन काटे
- डॉ. सौ. दीपलक्ष्मी कुलकर्णी
- श्री. सुधीरभाऊ जोशी
- श्री. राजेश सोमलवार