ब्राह्मण सभा, अमरावती ही सोसायटी कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था असून अमरावतीतील ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आणि समाजातील गरजूंना आधार देणे ही तिची उद्दिष्टे आहेत. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून सभा सातत्याने समाजसेवा करत आहे.
सुमारे ७८ वर्षांपूर्वी कै. कृष्णाजी गणेश सहस्रबुद्धे, कै. वासुदेव गणेश उर्फ काका तांबे, कै. दत्तोपंत नाटेकर आणि इतर समाजनेत्यांच्या प्रयत्नांतून अमरावतीत ब्राह्मण सभेची स्थापना झाली. संस्थापकांनंतर समाजातील अनेक सदस्य व कार्यकर्त्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा देऊन संस्थेला आजचे स्वरूप दिले.\n\nस्वातंत्र्यपूर्व काळात कै. श्री. दादासाहेब खापर्डे, कै. श्री. कृ. ग. सहस्रबुद्धे, कै. श्री. वा. ग. तांबे आणि कै. श्री. दत्तोपंत नाटेकर या प्रतिष्ठित समाजधुरिणांनी ब्राह्मण सभेची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी सभेचे कार्य अनौपचारिक पद्धतीने चालत असे. आजवर योगदान देणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या योगदानाशिवाय आजची ब्राह्मण सभा उभी राहिली नसती.
या कार्यातून प्रेरणा घेऊन १९६७ मध्ये ब्राह्मण सभेने नवीन कार्यकारिणी स्थापन करून संस्थेची नोंदणी केली. कै. श्री. बाबुरावजी गणोरकर, कै. श्री. रा. या. महाजन, कै. श्री. रा. गा. कुलकर्णी, कै. श्री. शिदोरे आणि कै. श्री. वासुदेवराव खापर्डे यांनी या कार्यात पुढाकार घेतला.\n\nसंस्था १६ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबई ट्रस्ट Act अंतर्गत नोंदवली गेली. नोंदणी क्रमांक: A/1413/अमरावती.
खापर्डे बगीचा येथे स्वतःची जागा घेऊन सभेचे कार्यालय सुरू करण्यात आले.
१९८४ साली ब्राह्मण सभेचे केवळ २५ सदस्य आणि शिल्लक ₹३०० होते. कै. श्री. बाबुराव गणोरकर (अध्यक्ष), श्री. वासुदेवराव खापर्डे (सचिव), रामभाऊ पसारकर (उपाध्यक्ष) आणि सहसचिव सुधीर कुलकर्णी यांनी सभेचे काम पुन्हा नेटाने सुरू केले.
दरोगा प्लॉट, राजापेठ येथे सभेने स्वतःची जागा खरेदी केली. या जागेचे भूमिपूजन पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते झाले. त्यावेळच्या कार्यकारिणीने वास्तू उभारण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली.
पुण्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष श्री. बिंदुमाधव जोशी यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन झाले.
ब्राह्मण सभेच्या विस्तारीकरणाची योजना आखण्यात आली. अमरावतीचे दानशूर कार्यकर्ते कै. श्री. प्रभाकरराव कुलकर्णी यांनी पत्नीच्या स्मरणार्थ बारा लाख रुपयांची देणगी दिली. या उदार देणगीमुळे ब्राह्मण सभेची वास्तू आणि विकास योजना पूर्ण होण्यास मदत झाली. पूर्ण झालेल्या सभागृहाचे नामकरण कै. श्रीमती जयश्री प्रभाकरराव कुलकर्णी सभागृह असे करण्यात आले.\n\nअंजनगाव सुर्जी येथील देवनाथ महाराज मठाचे मठाधिपती श्री. जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन झाले.