उपक्रम व योजना

ब्राह्मण सभा, अमरावती समाजासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कल्याणकारी उपक्रम राबवते. तिच्या प्रमुख उपक्रमांचा आढावा खालीलप्रमाणे.

विद्यार्थी सहाय्यता निधी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना आर्थिक सहाय्य करते. निधीच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजातून सहाय्याची रक्कम ठरवली जाते.

कोण अर्ज करू शकतो:

  • माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच नॉन-प्रोफेशनल पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी.

योजनेत समाविष्ट नाही:

  • इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, BBA, MCA यांसारखे प्रोफेशनल अभ्यासक्रम. निधी शिल्लक असल्यास व समितीने निर्णय घेतल्यास अपवादाचा विचार होऊ शकतो.

अर्ज कसा करावा:

  • वेबसाईटद्वारे किंवा सभेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज करावा.
  • ब्राह्मण सभेच्या सदस्याचे किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारसपत्र जोडावे.
  • मागील उत्तीर्ण परीक्षेचे आणि चालू शिक्षणाचे प्रमाणपत्र जोडावे.
  • समिती कागदपत्रे व आर्थिक परिस्थिती तपासून ७–१० दिवसांत निर्णय घेईल.
  • सहाय्याची रक्कम केवळ चेकद्वारे आणि समितीने ठरवलेल्या मर्यादेत दिली जाईल.

समिती:

  • श्री. मोहन काटे
  • डॉ. सौ. दीपलक्ष्मी कुलकर्णी
  • श्री. सुधीरभाऊ जोशी
  • श्री. राजेश सोमलवार

आरोग्य वर्धिनी योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास किंवा मोठे ऑपरेशन करावे लागल्यास या योजनेतून आर्थिक मदत केली जाते.

अर्ज कसा करावा:

  • रुग्णाने किंवा जवळच्या नातेवाईकाने सभेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात किंवा वेबसाईटद्वारे अर्ज करावा.
  • ब्राह्मण सभेच्या सदस्याचे किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारसपत्र आवश्यक आहे.
  • आजार, निदान किंवा ऑपरेशनची माहिती असलेली वैद्यकीय कागदपत्रे, हॉस्पिटल भरतीचे रजिस्ट्रेशन कार्ड आणि रुग्णाचे आधार कार्ड जोडावे.
  • आरोग्य वर्धिनी समिती तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि उपलब्ध निधीचा विचार करून मदतीचा निर्णय घेईल.

समिती:

  • डॉ. जयंतराव पांढरीकर
  • श्री. सुधीर जोशी
  • श्री. रमेश केशवराव देशमुख
  • सौ. दीपलक्ष्मी कुलकर्णी
  • श्री. सुनील पाठक

सामूहिक व्रतबंध सोहळा

ब्राह्मण मुलांचा हा महत्त्वाचा संस्कार योग्य वयात व अल्पखर्चात व्हावा यासाठी ब्राह्मण सभा दरवर्षी सामूहिक व्रतबंध (मुंज) सोहळा आयोजित करते. २०२३ चा सोहळा २२ मे २०२३ रोजी झाला.

मुख्य वैशिष्ट्ये:

  • किमान ५ नोंदणी आवश्यक.
  • शुल्क: प्रत्येक मौंजीसाठी ₹४,१००.
  • स्थळ: कै. श्रीमती जयश्री प्रभाकरराव कुलकर्णी सभागृह, ब्राह्मण सभा सांस्कृतिक भवन, राजापेठ.
  • बटू, आई-वडील व इतर सात अशा एकूण १० जणांची भोजनव्यवस्था.
  • १० पेक्षा अधिक व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती ₹२०० अतिरिक्त शुल्क; कमाल २५ व्यक्ती.
  • सभेतर्फे सामूहिक मातृभोजन (अष्टवर्ग) आयोजित केले जाते.
  • सभेतर्फे बटूंचा सामूहिक फोटो काढला जातो.
  • चौल करणे अनिवार्य.

पालकांनी आणावयाच्या वस्तू:

  • आचमन पळी (२), ताम्हण (२), पेले (२), लोटी, अहेर, उपरणे, पंचे (२), अंतरपाट उपरणे, मोत्याच्या मुंडावळ्या, निरंजन, तबक, टॉवेल, नॅपकिन, बटूचे नवीन कपडे व टोपी, भिक्षावळीचे साहित्य (हळद, कुंकू, फुले, तुळस, बेलपत्र, अक्षता), वाती, फुलवाती, पंचामृत (दूध, दही, साखर, तूप व मध), होमासाठी अर्धा पाव देशी तूप आणि कणकेचे चार दिवे.
  • बटूने सिल्क किंवा कॉटनची चड्डी घालावी; वडिलांनी सोवळे आणावे. सोबत कुलूप व किल्ली आणावी. भोजनाची वेळ दुपारी १२ ते २.

सभेतर्फे पुरवले जाणारे:

  • पुरोहित, कार्यस्थळ, साफसफाई, पूजेसाठी फुले, बटूचा हार व मनगट्या आणि भोजनव्यवस्था.
  • भोजनमेनू: मसालेभात, ताक, दोन भाज्या, पापड, पोळी, जिलेबी, चटणी किंवा सॅलड (बदलाचा अधिकार राखून).

आर्थिक अडचणीमुळे शुल्क भरू न शकणाऱ्या कुटुंबांनी ब्राह्मण सभा कार्यालय, दरोगा प्लॉट, अमरावती येथे संपर्क साधावा.

ज्ञानदीप व्याख्यानमाला

समाजातील ज्ञानवंत वक्ते व विचारप्रवर्तक विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच अध्ययन, चर्चा व सांस्कृतिक समृद्धी वाढवण्यासाठी सभा ज्ञानदीप व्याख्यानमाला आयोजित करते.

समिती:

  • डॉ. सौ. दीपलक्ष्मी कुलकर्णी
  • सौ. उज्वला कुलकर्णी
  • श्री. मोहन काटे

ऋणानुबंध App (वधू-वर परिचय सेवा)

ऋणानुबंध App ही ब्राह्मण सभा, अमरावतीद्वारे संचालित वधू-वर परिचय सेवा असून समाजातील विवाहेच्छुकांना एकमेकांशी जोडण्यास मदत करते.

मुख्य वैशिष्ट्ये:

  • वार्षिक सदस्यता शुल्क: ₹७०० (एक वर्षानंतर नूतनीकरण आवश्यक).
  • वधू किंवा वर पक्ष — कोणीही नोंदणी करू शकतो.
  • नोंदणी फॉर्ममध्ये एकदा नाव नोंदवल्यानंतर ते बदलता येत नाही; नाव अचूक नोंदवावे.

नोंदणीचे टप्पे:

  • प्राथमिक मोबाईल क्रमांकाने नोंदणी करून OTP द्वारे पडताळणी करावी.
  • विवाहेच्छुक वधू किंवा वराची माहिती देऊन प्रोफाईल तयार करावे.
  • ऑनलाईन पेमेंट करावे.
  • शुल्क भरल्यानंतर सर्च व प्रोफाईल पाहण्याच्या सेवा उपलब्ध होतात.
  • आपल्या निकषांनुसार सर्च करून निवडलेल्या प्रोफाईलला रिक्वेस्ट पाठवावी.
  • रिक्वेस्ट स्वीकारल्यास संपर्क क्रमांक शेअर केले जातात; त्यानंतर दोन्ही पक्ष थेट संपर्क साधू शकतात.
  • पुढील कार्यवाहीपूर्वी सर्व माहितीची खात्री व शहानिशा करावी.

प्रोफाईलसाठी मार्गदर्शन:

आपण निश्चित केलेल्या प्राधान्यांशी जुळणारे प्रोफाईल पहिल्या पानावर दिसतील; अधिक प्रोफाईलसाठी सर्च व फिल्टर वापरावे. “आपल्या विषयी माहिती” या भागात व्यक्तिमत्त्व, कुटुंब, भविष्यातील योजना, आवडी-निवडी, विशेष शिक्षण, कामगिरी, पुरस्कार आणि जोडीदाराकडून अपेक्षा यांची थोडक्यात माहिती मराठी किंवा इंग्रजीत लिहावी.

सूचना:

ऋणानुबंधवरील माहिती सदस्यांनी स्वतः दिलेली असते. ब्राह्मण सभा त्या माहितीची हमी देत नाही किंवा पडताळणी करत नाही.

समिती:

  • सौ. अलका सरजोशी
  • श्री. पराग अंधारे
  • सौ. माया सुधीर जोशी
  • सौ. संध्या रवींद्र जोशी
  • श्री. प्रसाद खरे
  • सौ. मनीषाताई मराठे

सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम

सामाजिक बंध दृढ करण्यासाठी व सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी सभा नियमितपणे सांस्कृतिक कार्यक्रम, उपवधू-वर परिचय मेळावा, महिला शाखेचे कार्यक्रम आणि समाजमेळावे आयोजित करते.

सांस्कृतिक समिती:

  • सौ. मनीषा मराठे
  • श्री. विवेक मराठे
  • श्री. प्रसाद खरे
  • श्री. राजेश सोमलवार

उपवधू-वर परिचय व वेबसाईट समिती:

  • सौ. अलका सरजोशी
  • श्री. पराग अंधारे
  • सौ. माया सुधीर जोशी
  • सौ. संध्या रवींद्र जोशी
  • श्री. प्रसाद खरे
  • सौ. मनीषाताई मराठे

टेबल टेनिस व मनोरंजन

सभा टेबल टेनिस सुविधा व संबंधित उपक्रमांद्वारे मनोरंजन आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देते.

समिती:

  • श्री. विवेक अरुणराव मराठे
  • श्री. भवानीशंकर देव
  • श्री. पराग शरद अंधारे
  • सौ. उज्वला कुलकर्णी
  • श्री. सुनील पाठक

सभासदत्व

सामान्य सभासद:

  • प्रवेश शुल्क ₹३० आणि वार्षिक शुल्क ₹१५०.
  • ऑनलाईन फॉर्म वेबसाईटवर उपलब्ध.

आजीव सभासद:

  • एकरकमी शुल्क ₹५,०००.
  • ऑनलाईन फॉर्म वेबसाईटवर उपलब्ध.

देणगी

सभा विद्यार्थी सहाय्यता निधी व आरोग्य वर्धिनी योजना यांसह विविध कल्याणकारी योजनांसाठी देणगी स्वीकारते. देणगी देण्यासाठी कृपया सभेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.